नागपूर : भाजपची स्थिती काटोल, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूर मतदारसंघात जिंकून येत नाही, त्या ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचा उमेदवार असेल, असे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे. असे असताना भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे कशाच्या आधावर शहरातील सर्व सहा जागा लढण्याची वल्गना करतात, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूर शहर व ग्रामीणमधील एकूण १२ विधानसभा मतदारसंघात लढणार, असे जाहीर केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे ( अजित पवार) प्रशांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही महायुतीमध्ये भाजपचा झेंडा घेऊन प्रचारासाठी आलो नाही, असे पवार यांनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा…राजकीय धक्का: आमदार रवी राणा भाजपचे समन्‍वयक? पक्षाचे पदाधिकारी अस्‍वस्‍थ

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रचार राष्ट्रवादीने केला होता. गडकरींच्या विजयात राष्ट्रवादीचा वाटा आहे. भाजपने जागा वाटपाच्या चर्चाचे मान ठेवावा आणि युतीचा धर्म पाळत घटक पक्षांचा विचार करावा. आम्ही देखील त्यांचा प्रचार करू, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा…काँग्रेसच्या माजी आमदाराला वंचितकडून उमेदवारी; १० उमेदवारांची यादी जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता पक्ष नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र ऊर्फ बंटी कुकडे यांनी पत्र परिषद घेवून नागपूर शहर व ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १२ जागांवर दावा केला आहे. राज्यात भाजप ११० जागांवर लढणार आहे तिथे आम्ही पूर्ण ताकतीने काम करू भाजपाचा उमेदवार निवडूण आणू ज्या ठिकाणी शिंदे गटचा उमेदवार असेल त्या ठिकाणी सुध्दा ताकद उभी करू, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी सुध्दा शिंदे गट व भाजपने प्रचार करून महायुतीचा धर्म पाळावा, असेही प्रशांत पवार म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक राजेश माटे, राकेश बोरीकर, उपाध्यक्ष सुखदेव वंजारी, विद्यार्थी शहराध्यक्ष विश्वजीत तिवारी, हिंगणा तालुकाध्यक्ष बिरू सिंग तोमर, उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, मिडिया प्रमुख अभिनव फटिंग उपस्थित होते.