New Nursing College among 9 Government Medical Colleges Finance Minister announcement mnb 82 ysh 95 | Loksatta

नागपूर : ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन नर्सिंग महाविद्यालय!, अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे आशा पल्लवित

२०१४ पासून राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे नवीन नर्सिंग महाविद्यालयाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

narsing college for students
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महेश बोकडे

नागपूर : केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारच्या (१ फेब्रुवारी २०२३) अर्थसंकल्पात २०१४ पासून स्थापन १५७ वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहस्थानांवर नवीन नर्सिंग महाविद्यालयांची घोषणा केली. २०१४ पासून राज्यात ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे नवीन नर्सिंग महाविद्यालयाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

राज्यात वर्ष २०१४ पूर्वी १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये होती. त्यात केवळ नागपुरात मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. २०१४ नंतर राज्यात चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, बारामती, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदूरबार, उस्मानाबाद अशी ९ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये सुरू झाली. त्यातच जुन्या १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारित सध्या नर्सिंग महाविद्यालय आहे.

हेही वाचा >>> MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?

तूर्तास १० ठिकाणी जेएनएम, ५ ठिकाणी बी.एस्सी. नर्सिंग (नांदेड, औरंगाबाद, मेडिकल-नागपूर, पुणे, जेजे-मुंबई), ३ ठिकाणी एम.एस्सी. नर्सिंग (पुणे, मेडिकल-नागपूर, जेजे-मुंबई) महाविद्यालयांचा समावेश आहे. २०१४ नंतर राज्यात नऊ नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नर्सिंग महाविद्यालय नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे नर्सिंग महाविद्यालय स्थापनेसाठी वेग येईल, असे म्हटले जात आहे.

प्रत्येक जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन आग्रही आहे. २०१४ नंतर सुरू झालेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन नर्सिंग महाविद्यालयांसाठी वैद्यकीय शिक्षण खाते तातडीने आवश्यक प्रक्रिया करेल.

– राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण खाते, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 10:15 IST
Next Story
MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?