लोकसत्ता टीम

बुलढाणा: जेमतेम आठवढ्यापूर्वीच थाटात लग्न लागले, दोन्ही घरची सत्यनारायणाची पूजा झाली. शेगाव येथे दर्शनासाठी आले असता बायको अचानक बेपत्ता झाली. यामुळे जळगाव खान्देश येथील रहिवासी (पती) सुभाष चौधरी थक्क व हवालदिल झाला असून शेगाव शहर पोलीस नवविवाहितेचा शोध घेत आहेत.

चौधरी यांचा विवाह २२ मे रोजी मोहा (तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ) येथील शीतल मधुकर भोपळे हिच्या समवेत झाला. लग्नानंतरचे विधी व पूजा झाल्यावर नवदाम्पत्य शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनासाठी आले.

हेही वाचा… वाशीम: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लेख, ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदु पोस्ट’ वेबसाईटवर वर बंदीसह कारवाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराजांचे आशीर्वाद घेऊन संसाराला सुरुवात करू या उद्धेशाने संतनगरीत आल्यावर चौधरी यांनी खाजगी ‘गेस्ट हाऊस’ मध्ये खोली घेतली. ते ‘फ्रेश’ होण्यासाठी बाथरूम मध्ये गेले. मात्र बाहेर आल्यावर त्यांना आपली सौभाग्यवती न दिसल्याने त्यांना मानसिक धक्काच बसला. त्यांनी परिसरात तिचा शोध घेतला. नंतर त्यांनी थेट शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून बायको हरविल्याची तक्रार दिली.