वर्धा : नव्वद टक्के भ्रमणध्वनी संच नादुरुस्त मात्र शंभर टक्के बिनचूक कामाची अपेक्षा कशी पूर्ण करणार, असा सवाल करीत अंगणवाडी सेविकांनी आपले संच शासकीय कार्यालयात परत केले. सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून सुरू असलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे. आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे तीन जानेवारीपासून हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा >>> “आदित्यच्या बापाचेच पद…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आज सेलू तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत नव्वद भ्रमणध्वनी संच आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती रेखा काचोळे यांनी दिली. शासनाने २०१९ ला दिलेले संच निकृष्ट दर्जाचे आहे. ते धड चालत नाही व आता तर त्यात ‘पोषण ट्रॅकर’ हे ‘ॲप’ घेता येत नाही. यापूर्वी आंदोलन केल्यावर शासनाने नवा संच देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार तत्कालीन महाविकास आघाडीने दहा हजार रुपयांचा संच देण्याचे ठरवत तशी तरतूद केली होती. मात्र, सरकार बदलले आणि ठप्प झाले.

हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाचा संच बंद असल्याने सेविकांना स्वतःच्या भ्रमणध्वनी संचावर काम करण्याची सक्ती अप्रत्यक्षपणे करण्यात येते. ते नेहमी शक्य नसल्याने कामे होत नाही. जिल्ह्यात १ हजार ४६८ संच शासनाने दिले होते. पण जवळपास सर्वच बंद पडल्याने सेविका त्रस्त झाल्याचे कर्मचारी नेत्या पारबती जुनघारे, सुनीता भगत, मुक्ता खंडाते, प्रतिभा नैताम यांनी दिली. रोज असे संच परत करण्याचे आंदोलन चालणार असल्याचेही सांगण्यात आले.