नागपूर: शिदे-फडणवीस सरकारमध्ये नागपूर जिल्ह्यात फडणवीस यांच्या रुपात एकच मंत्रीपद आहे, विस्तारात ही संख्या वाढेल किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे, मात्र पैसे घेऊन मंत्रिपद देण्याचे आमिष दाखवणाऱ्या निरज राठोड च्या अटकेमुळे जिल्ह्यात मंत्री होण्यास इच्छुक असणाऱ्यांची नावे मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहेत.

२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये फडणवीस यांच्यासह बावनकुळे मंत्री होते. आ. कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले जात होते. पण शेवटपर्यंत ते मिळालेच नाही. उलट नागपूरचेच परिनय फुके यांना भंडाऱ्याच्या कोट्यातून मंत्री करण्यात आले. सत्ताबदलानंतर पुन्हा नागपूर जिल्ह्यातून कोण मंत्री होणार ही चर्चा रंगली, पण फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने व त्यांच्याकडे पालकमंत्रीपद असल्याने दुसऱ्याला संधी मिळण्याची शक्यता मावळली. पण, यामुळे आमदारांच्या मनातील मंत्री होण्याची सुप्त इच्छा काही कमी झाली नाही. दरम्यान निरज राठोडला अलीकडेच पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे नाव सांगून आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवने व पैशाची मागणी करणे असा आरोप आहे.

हेही वाचा >>>नागपूर: आम्हालाही हवा सातवा वेतन आयोग अन् शासकीय लाभ; महाराष्ट्रातील हत्तींची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राठोडने नागपूर जिल्ह्यातील विकास कुंभारे (मध्य नागपूर) व टेकचंद सावरकर (कामठी) यांना दूरध्ववनी केले होते. यानंतर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही त्यांना अशाच प्रकारचा दूरध्वनी आल्याचे स्वत:हून सांगितले. त्यामुळे मंत्रिपदाच्या इच्छुकांच्या यादीत सध्यातरी वरील तिघे असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत आणखी काही आमदारांची नावे पुढे येतात का ? याबाबत उत्सूकता आहे.