नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरातील संत्री, सावजी मटन, हातमाग व पावरलुमच्या साड्यांची ते नेहमीच प्रशंसा करतात. उपराजधानीतील एका कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत गडकरींनी नागपुरातील सावजी मटनच्या चवीबाबतही महत्वाचे भाष्य केले. नितीन गडकरी नेमके काय म्हणाले ? आपण जाणून घेऊ या.

कोलबास्वामी फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी एस. एस. बी. सभागृहात संपन्न झाला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत नितीन गडकरी पुढे म्हणाले, नागपुरातील सावजी मटनाचे हाॅटेल चालवणाऱ्यांची कमाई चांगली आहे. हे उत्पन्न सावजी नावामुळे नाही. तर सावजी पद्धतीच्या चांगल्या चवीमुळे आहे. या पदार्थातील चवीचे कौशल्य हलबा बांधवांनी विकसीत केल्याने येथील सावजी मटनाच्या हाॅटेलमध्ये ग्राहकांचे आकर्षन असून तेथे नेहमीच गर्दी दिसते, असेही गडकरी यांनी सांगितले. ज्ञान ही एक शक्ती आहे. त्यात व्यक्तीत्व, कर्तुत्व, गुणवत्ता, नेतृत्व, मानवी नातेसंबंध या गुणांचा समावेश होतो. या लहान- सहान गुणांच्या आधारावरच समाजात चांगला व्यक्ती घडतो व त्याचे समाजाकडून मुल्यांकण होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला वाघिनीचे दूध म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणातून ज्ञान आणि ज्ञान व संस्काराच्या आधारातून स्वत:च्या पायावर उभे व्हायला हवे. प्रत्येकासाठी परीक्षा महत्वाची आहे. परंतु आई- वडलांपासूनची शिकवण, शिक्षकांसह गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानाचेही प्रतिबिंब विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वात उतरत असते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे चाल- चलन, व्यवहारही चांगले ठेवायला हवे. प्रत्येकाने उत्तम बोलने, भाषेवर प्रभुत्व, कमी शब्दात बाजू मांडण्याचे कौशल्य शिकायला हवे. समाजासाठी चांगले काम करायला हवे, असेही गडकरी यांनी सांगितले. त्यांनी चांगले गुण मिळवलेल्या हलबा समाजातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी आमदार प्रवीण दटके आणि कोलबास्वामी फाऊंडेशनचे पदाधिकाऱ्यांसह हलबा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुणांनी नोकरी मागणाऱ्यापेक्षा देणारे व्हावे – गडकरी

तरुणांनी नोकरी मागणाऱ्यापेक्षा देणारे होण्याची गरज आहे. त्यातून समाजाची प्रगती शक्य आहे. ज्ञान प्राप्त करणे ही पहिली पायरी आहे. परंतु पुढे समाजोपयोगी, लोकोपयोगी कामे करून चांगला व्यक्ती व्हायला हवा. हे चांगल्या वागणूकीतून शक्य आहे. आर्थिक प्रकतीशिवाय समाजाची प्रगती शक्य नसल्याचेही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धापेवाडातील साडीचा प्रकल्प बेला, खापा परिसरातही

हलबा समाजातील महिलांना रोजगार देण्यासाठी धापेवाडा येथे पुर्ती एग्रोटेकच्या मोठ्या इमारतीचे काम सुरू आहे. येथे कोसाची आणि काॅटनच्या अद्यावत साड्या तयार केल्या जाईल. या साड्यांना खूप मागणी आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा करणेही कठीन होत आहे. भविष्यात हा प्रकल्प बेला आणि खापा परिसरातही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.