केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. रविवारी नागपुरात २०२४ च्या निवडणुकिसंदर्भात मोठी घोषणा केली. रोजगार मिळाला तरच गरिबी दूर होणार, प्रत्येकाची आर्थिक प्रगती होईल आणि ती झाली तरच विदर्भ आणि नागपूरचा विकास होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मिहानमध्ये एक लाख रोजगार देणार असे आश्वासन गडकरी यांनी दिले. फॉरचून फाउंडेशनच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते.

हेही वाचा >>> अनिल देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, प्रस्ताव कोणी कोणाला दिला ?

गडकरी म्हणाले, रोजगार हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी आपल्याला उद्योग आणावे लागतील, पर्यटन क्षेत्राचा विकास करावा लागेल. यातूनच आपण अधिक रोजगारनिर्मिती करू शकतो असेही गडकरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिहानमध्ये आतापर्यंत ८७ हजार रोजगार दिले आहेत. यात आणखी नवीन कंपन्या येऊ घातल्या असून भविष्यात रोजगार निर्मिती होणार आहे. नागपूर एमआयडीसीमध्येही ११ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. मी जे उपक्रम आणि उद्योग सुरू केले त्याचा अडीज हजार कोटींची टर्न ओवर आहे. आणि यातून पंधरा हजार लोकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे रोजगार फार महत्त्वाचा विषय आहे. यासोबतच आपण रोजगार देणारे व्हायला हवे असेही गडकरी म्हणाले.