रस्त्यावर धावणारी १५ वर्षे जुनी सर्व सरकारी वाहने मोडीत काढावी लागणार असून त्यासाठी स्क्रॅपिंग युनिट लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व राज्यांना निर्देश देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – Aftab Lie Detector Test: बालपण, श्रद्धाबरोबरचं डेटींग, त्या रात्री काय घडलं, हत्यार अन्…; आफताबला विचारण्यात आले ५० प्रश्न

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

भारत सरकारची किंवा भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व सरकारी वाहने १५ वर्षांनंतर मोडीत काढावी लागणार आहेत. १५ वर्ष जुने कोणतेही सरकारी वाहन रस्त्यावर धावू शकणार नाही. यासंदर्भातील निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले असून या गाड्या मोडीत काढण्यासाठी लवकरच स्क्रॅपिंग युनिट लावण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसेच सर्व राज्यांनी त्यांच्या डेपोमधील १५ वर्ष जुन्या बस, ट्रक आणि इतर वाहनेसुद्धा मोडीत काढावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान यापूर्वी सरकारने दिल्ली आणि एनसीआरमधील १० वर्ष जुन्या डिझेल आणि १५ वर्ष जुन्या पेट्रोलवरील वाहनांवर बंदी घातली घालण्याचा निर्णय घेतला होता.