नागपूर : आश्रमशाळेत डाव्या आणि उजव्या अंगठ्यांचे ठसे उमटवून अनुदान मिळवणाऱ्यांची कमतरता नाही, पण मला त्यात पडायचे नाही. ज्यांना राजकारण करायचे त्यांना करू द्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने व्यासपीठावरील मान्यवरांसह सभागृहात बसलेले सारेच अवाक झाले.

हेही वाचा – राज्यपालांच्या दौऱ्यासाठी संतनगरी शेगावमध्ये महाबंदोबस्त, भाविकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी काय करायचे जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. कितीही आश्रमशाळा उघडल्या, कोंबड्या, बकऱ्या वाटल्या तरी समाजाचा विकास होणार नाही. शिक्षण आणि त्यातून मिळालेले ज्ञानच समाजाला विकासाच्या प्रवाहात घेऊन जाईल. आमदार येतील, मंत्री होतील, जातील आणि हे चालतच राहील. १८ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना मीही शिक्षण देत आहे. १२०० शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. शासनाकडून त्यासाठी एकही रुपयाचे अनुदान घेत नाही. गेल्या २३ वर्षांपासून हे काम करत आहे आणि ते पण ‘लो प्रोफाईल’वर, कोणताही गाजावाजा न करता. त्यामुळे कितीही आश्रमशाळा उघडल्या, कोंबड्या, बकऱ्या वाटल्या, सायकली वाटल्या तरी समाजाचा विकास होईलच, असे नाही. त्यासाठी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, यादृष्टीने प्रयत्न करा. शैक्षणिक स्तर वाढवा, उद्यमशिलता निर्माण करा, असा सल्ला गडकरी यांनी दिला.