नागपुर: नितीन गडकरींनी शुक्रवारी नागपुरात आदिवासी मुलांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे अनेक किस्से सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना आपणच राजकारणात अआणले याची आठवण करून दिली.

“आदिवासी मंत्री हे एका कॉलेजच्या प्राचार्य होते. मीच त्यांना राजकारणात आणलं. त्यामुळे मी त्यांना सांगतो आपल्या मुलीला डॉक्टर इंजिनियर कशा झाल्या पाहिजे, यूपीएससी पास कसे झाल्या पाहिजे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्याचे संबंधित ट्रेनिंग आदिवासी मुला-मुलींना उपलब्ध करून दिलं पाहिजे. आश्रम शाळांचं रेटिंग केलं पाहिजे. ज्यांचं रेटिंग चांगला आहे, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचे इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी मदत केली पाहिजे. एक चर्मकार समाजाची मुलगी माझ्याकडे आली होती ती एअर होस्टेस म्हणून सिलेक्ट झाली होती. अनेक मुली एअर इंडिया, इंडिगो सारख्या विमानांमध्ये काम करतात. आपल्या मुलांना उत्तम कौशल्य कस मिळेल यासाठी योजना सुरू करण्याची गरज आहे”, असेही नितीन गडकरी म्हणाले.

हेही वाचा >>>कारागृहात ई-मुलाखतीची सुविधा! कैद्याना कुटुंबाशी साधता येईल संवाद

आश्रमशाळा वाटण्याचा धंदा बंद करा

“शाळा, कॉलेज आणि आश्रम शाळा आमदारांना आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका. मी पण वाटल्या माझ्या काळात पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की चांगलं काम करा. विद्यार्थ्यांना शिकवा. त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. शाळा चांगल्या करा, त्यानंतर दोन पैसे आपल्या खिशात घाला. पण सगळे पैसे आपल्या खिशात घालू नका. विद्यार्थ्यांना चांगलं नागरिक घडवता आलं. रेटिंग ठेवा. स्पर्धा असली पाहिजे. मुलांना मंत्र्यांच्या शिफारशीने सिलेक्ट करू नका, तर रेटिंग देऊन त्या सुधाराव्यात. त्याची गुणवत्ता सुधारेल तर भविष्यातले अनेक चांगले खेळाडू संशोधक आणि मुलं तयार होतील”, असेही नितीन गडकरींनी सांगितले.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील शेफचा किस्सा

मुंबईमध्ये मी एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. त्या हॉटेलमध्ये एक शेफ आहे. त्याचं नाव डेविड आहे. तो हाँगकाँगचा आहे. त्याला मी विचारलं की तुला पगार किती भेटतो? त्यावर त्याने मला १५ लाख रुपये महिना पगार मिळतो, असे सांगितले. आता यावरुन उदाहरण घ्या की एका शेफला पंधरा लाख रुपये पगार मिळतो, यात त्याचा कौशल्य आहे. ज्याची गुणवत्ता आहे, त्याच्याकडे लोक जातात”, असे नितीन गडकरी म्हणाले.