लोकसत्ता टीम

वाशीम: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शासकीय कामे ठप्प झाली असून जनतेला विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आक्रमक भूमिका घेत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

आणखी वाचा- जुन्या पेन्शनसाठी संप अन् आरोपींना कंप, जामीन नाहीच

जिल्ह्यातीलशासकीय,निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे संपात झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीस मध्ये नमूद केले आहे की , संपात सहभागी होणे कार्यालयीन शिस्तीत अनुसरून नसून प्रशासकीय कामकाज खोलंबत आहे. त्यामुळे आपणाविरुद्ध जिल्हा परिषद सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबत संप कऱ्याकडून २४ तासात स्पष्टीकरण मागितले आहे. वेळात स्पष्टीकरण न दिल्यास कारवाई करण्याचे सूचित केले असून सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांना देखील सूचित केले आहे. संपकरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.