scorecardresearch

Premium

नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक

नागपूरच्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाउंड या प्रकारात अंतिम सामना खेळत हे सुवर्णपदक जिंकले.

Ojas Deotale of Nagpur
नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : नागपूरच्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाउंड या प्रकारात अंतिम सामना खेळत हे सुवर्णपदक जिंकले. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.

हेही वाचा – भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…

pramod bhagat
जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा: यथिराज, प्रमोद, कृष्णाचा अंतिम फेरीत प्रवेश
ITTF World Table Tennis Team Championship Updates
Paris Olympics : भारतीय टेबल टेनिस संघांनी रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र
badminton asia team championships indian women enter maiden final after beating japan
आशिया सांघिक बॅडिमटन स्पर्धा: भारतीय महिलांची अनमोल कामगिरी, जपानवर मात करत अंतिम फेरीत धडक
U 19 world cup match , Which players of India are especially expected in the final match of the Under 19 World Cup 2024
युवा विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूंकडून विशेष अपेक्षा?

हेही वाचा – पेपरफुटीचे सत्र सुरूच; देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या विभागाचाच पेपर फुटला…

ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्रीक साधल्याने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे नागपुरकरांनी शहरात मोठा जल्लोश साजरा केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ओजस हा पहिलाच नागपूरकर आहे. ओजसने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कम्पाउंड इव्हेंटमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच गुरुवारी आर्चरी मेन्स कम्पाउंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. इतिहासात प्रथमच नागपूरच्या खेळाडूनं आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजस देवतळेच्या आई-वडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ojas deotale of nagpur golden performance third gold medal in a row in archery at the asian games rgc 76 ssb

First published on: 07-10-2023 at 14:50 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×