Solar Explosives Company Explosion Nagpur नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात १ कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.
स्फोटातील सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. नागपुरातील बाजारगाव परिसरातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल (३ सप्टेंबर २०२५) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. कंपनीतील सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने पळत गेले.
मात्र संबंधित प्लांट मधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही. तेवढ्यात तिथे जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले. आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. घटनेची माहिती कळताच पोलीस, अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळपासून सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढली असून सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांना ही आत घेण्यात आलेले नाही.
जखमींना बाहेर काढण्यासाठी…
सुरुवातीला घटनास्थळी काही वेळ पुन्हा स्फोट घडणार नाही याची काळजी म्हणून वाट पाहण्यात आली, त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.. सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
सुरक्षेच्या कारणावरुन कंपनीच्या आत प्रवेश नाही…
अनिल देशमुख यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठण च्या गाडीने ६ जखमींना नागपूर कडे रवाना केले आहे. मेडीकल मध्ये नेण्यात येणार आहे. सिव्ही युनिट मध्ये स्फोट झाला आहे. जखमी सर्व घटना स्थळाच्या बाजुलाच २०० मीटरवर असलेल्या लॅब मध्ये काम करत होते. घटना स्थळी किती कामगार होते त्याची सुरवातीला मिहिती मिळाली नाही. सुरक्षेच्या कारणावरुन कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कंपनीच्या दोन रुग्णवाहिकेतून जखमी कामगारांना तातडीने नागपुरातील विविध रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.