नागपूर : उन्हाळा असूनही अवकाळी पावसाचे डोकावणे काही थांबलेच नाही. त्यामुळे तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाड्यात मात्र प्रचंड वाढ झाली आहे. कुलर आणि एसीच्या थंडाव्यात माणसं हा उकाडा घालवतील, पण जंगलातल्या वन्यप्राण्यांचे काय? त्यांना जंगलातल्या पाणवठ्यात डुंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. ताडोबाच्या जंगलात वाघीण तिच्या बछड्यासह पाण्यात डुंबतानाचा असाच एक सुंदर व्हिडिओ समोर आला आहे. पीयूष आकरे, असीम भगत व नितीन बारापात्रे यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

उन्हाळ्याची गर्मी सुरू होताच आतापर्यंत जंगलाच्या आत राहणारे वाघ आणि त्यांचे कुटुंबीय तहान भागवण्यासाठी बाहेर येऊ लागले आहेत. पण, याच उन्हाळ्यात अवकाळी पाऊस देखील पडत असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. तहानेने जसा जीव व्याकुळ होत आहे, तसेच उकाडा देखील असह्य होत आहे. त्यामुळे पाणवठ्यावर जाऊन तहान भागवत असतानाच तलावात तासनतास डुंबून उकाडा घालवण्याचा प्रयत्न वन्यप्राणी करत आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “के मार्क” या वाघिणीला न ओळखणारे असे नाहीतच. ताडोबात ती पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ती तिच्या दोन बचड्यांसह फिरताना नेहमीच दिसून येते.

हेही वाचा – “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वारालगतच्या वनक्षेत्रात “के मार्क” वाघीण तिच्या बछड्यांसाह तलावावर पाणी पिताना दिसली. तहान तर भागली पण उकाडा त्यांना सहन होई ना! मग त्यांनी तलावातच ठाण मांडले. तलावातील पाण्यात मनसोक्त डुंबत असह्य उकड्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांसाठी ही पर्वणीच होती. त्यांनीही मग कॅमेरे काढून ते दृश्य टिपण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याची गर्मी सुरू होताच ताडोबाच्या सोमनाथमधील “के मार्क” वाघीण आणि तीच्या बछड्याची मनमोहक छायाचित्रे व व्हिडीओ डेक्कन ड्रिफ्टसचे प्रमुख व वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे, असीम भगत व नितीन बारापात्रे यांनी टिपली आहे.