अकोला बाजारात हरभरा विक्रीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन हमीभावावर हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ दखल घेऊन हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत सहकार विभागाने आदेश निर्गमित केले असून २७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ करण्याचे निर्देश आठ संस्थांना देण्यात आले.

हेही वाचा- गडचिरोली: एका जहाल नक्षलवाद्यास अटक

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेड यंत्रणेकडून केंद्र सुरू करण्यात आलेले नव्हते. हरभरा पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात आलेले आहे. शासनाने हरभरा खरेदी केंद्र उघडलेले नसल्याने शेतकरीवर्गाला त्याची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना आपला उत्पादित हरभरा खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकणे भाग पडत होते. शासनाकडून हरभऱ्यासाठी ५ हजार ३३० प्रतिक्विंटल आधारभूत किंमत निश्चित केलेली असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा विकावा लागला. प्रतिक्विंटल सरासरी हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. शासनाने अत्यंत तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात केली.

हेही वाचा- चंद्रपूर: वाघ जुमाणेना…. गुराखी ठार, गोठ्यात शिरून बैलाचाही घेतला घास!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ संस्थांच्या नावे आदेश निर्गमित

आमदार सावरकर यांनी सहकार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी लावून धरली. केंद्र शासनाकडून याबाबतचे प्रस्तावाला मान्यता मिळाली असून लवकरच खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे स्पष्ट केले. यासंदर्भात सहकार विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे यांच्या स्वाक्षरीने आठ संस्थांच्या नावे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.