नागपूर : दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याचा सुड उगवण्यासाठी भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. या प्रतिहल्ल्याच्या घडामोडी लोकांपर्यंत पोहचवण्याच्या बहाण्याने समाजमाध्यमांमध्ये अनेक खोटे चित्रफिती व्हायरल केले जात आहेत. त्यासाठी काही जुन्या छायाचित्रांचा आणि चित्रफितीचा वापर केला जात असून ते ऑपरेशन सिंदूरचा भाग असल्याचे दावा केला जात आहे. अनेक वृत्त वाहिन्या ‘ब्रेकिंग न्युज’ नावाखाली असे वृत्त असल्याचे दिसून आले.

मात्र त्या खोट्या असल्याची याची सत्यता पडताळणी केली असता निदर्शनास आले आहे.भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर समाजमाध्यमांवर या कारवाईचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या शेकडो चित्रफिती व्हायरल केल्या जात आहेत. काही छायाचित्रे आणि व्हिडिओ जे मूळ घटनेशी संबंधित नाहीत तसेच काही जुने असूनही, समाजमाध्यमावर प्रसारित केले जात आहेत. द इंडियन एक्सप्रेस समूहाच्या लाईटहाऊस जर्नालिझमच्या फॅक्टचेकर अंकिता देशकर यांनी काही छायाचित्रांची आणि चित्रफितींची पडताळणी केली असता ते भ्रामक आणि दिशाभूल करणारे असून त्यांचा ‘ऑपरेशन सिंदूर’शी काही संबंध नसल्याचे दिसून आले.

सत्यता पडताळणीतील तत्थे

वॉचरॲनॉन यांनी एक्सवर एक चित्रफिती सामायिक केली आणि त्यात पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्या दावा केला. ही चित्रफित नंतर अनेकांनी सामायिक केली. पडताळणी केल्यानंतर ही चित्रफिती २०२० मध्येच एक्सवर पोस्ट करण्यात आली होती व ती बेयर्ट, लेबनानमधील असल्याचे दिसून आले.

‘रिपोर्ट काश्मीर’ या नावाने एका व्यक्तीने एक्सवर एक छायाचित्र सामायिक केली. त्यात पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला आहे. हे छायाचित्र अनेकांनी एक्सवर सामायिक केले. तपासाअंती हे छायाचित्र २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तातील असल्याची बाब समोर आली.

जॅक या नावाने इंस्टाग्राम वापरणाऱ्याने रात्रीच्यावेळी आकाशात अग्निबाण सोडतानाची चित्रफिती सामायिक केली व ती ऑपरेशन सिंदूरची असल्याचा दावा केला. तसेच ही चित्रफिती माध्यम संघटनांनी सामायिक केली. या चित्रफितीची तपासणी केली असता ती डीडी इंडिया यू टूबस चॅनलवरील सात महिन्यांपूर्वीची असून त्यावर इराणच्या क्षेपणास्त्रांनी नेगेव वाळवंटातील नेवतिम हवाई तळाला लक्ष्य केले, असे शिर्षक आहे.

जनार्दन मिश्रा यांनी एक्सवर ऑपरेशन सिंदूरशी संबंधित चित्रफित सामायिक केली. त्यावर त्याने ‘घर में घुसकर मारा है कब्र तुम्हारी खोदी है, दिल्ली की गद्दी पर बैठा बाप तुम्हारा मोदी है।’ असा मजकूर लिहला आहे. वास्तविक ही चित्रफित पॅलेस्टिनमधील असून ती १४ एप्रलि रोजी ‘इंस्टाग्राम’वर पोस्ट करण्यात आली होती. ती अनेकांनी दुसऱ्यादिवशी समाजमाध्यमांवर सामायिक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहित कमाल रथ यांनी ‘एक्स’वर शुक्रवारी एक चित्रफित सामायिक केली. त्याला भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्धवस्त केले, असे शिर्षक दिले. तसेच माध्यम समूहाच्या संकेतस्थळावर देखील ही चित्रफिती सामायिक करण्यात आली. त्याची पडताळणी केल्यानंतर ही चित्रफित फिलाडेल्फिया विमान अपघाताची असल्याचे स्पष्ट झाले आहे.