लोकसत्ता टीम

नागपूर: पंतप्रधान म्हणतात विरोधी पक्ष हिंदूंचा अपमान करतात, गुजरातमध्ये मागील पंचवीस वर्षापासून भाजपचे सरकार आहे, तेथे हिंदू शेतमजुरांच्या मजुरीत किती वाढ झाली हे पंतप्रधानांनी जाहीर करावे, असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केले आहे.

मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेत बोलताना शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमीप्रमाणे ‘माझ्या हिंदू बांधवांनो’ अशी न केल्याने त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. त्याचा हवाला देत जावंधिया म्हणतात ‘ मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तामिळनाडूतील भाषण ऐकले. त्यात त्यांनी विरोधी पक्ष हिंदूचा अपमान करतात अशी टीका गेली. गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा गुजरातच्या निवडणूक सभेत ‘ एैसा सबक सिखाया की अब कोई सिर नही उठायेगा’ असे म्हणाले होते.

आणखी वाचा- जागतिक वनदिन विशेष: वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ 

मागील पंचवीस वर्षापासून गुजरातमध्ये व दहा वर्षात देशात भाजपचे सरकार आहे. ते हिंदृत्वाचे राजकारण करतात. मोदी ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणतात. या पाश्वभूमीवर गुजरातमध्ये पंचवीस वर्षात सत्ता असताना हिंदू शेतमजुरांची शेतमजुरी किती वाढवली? कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच्या तुलनेत त्यात वाढ झाली का ? याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, असे जावंधिया यांनी त्यांच्या पत्रात नमुद केले आहे. मोदी पाच किलो धान्य फुकट देतात. सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात १ रुपया-२ रुपये किलो अन्न सुरक्षा योजना या नवीन गुलामी लादणाऱ्या योजना आहे. सबाका साथ सबका विकास साध्य करण्यासाठी शेतमजुरांची मजुरी वाढली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.