कर्मचाऱ्यांमध्ये भीती व तणावाचे वातावरण

नागपूर : वनमुख्यालयातील वर्ग तीन आणि चार संवर्गाचे नागपूर वनवृत्तात होणाऱ्या विलीनीकरणाला मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी विरोध के ला आहे. याबाबत त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबलप्रमुख) यांना निवेदन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य वनविभागात एकू ण ११ वनवृत्त कार्यरत आहेत. प्रत्येक वनवृत्तात वर्ग तीन आणि चार या संवर्गाची आस्थापना व ज्येष्ठता सुची तसेच बदलीबाबतचे अधिकार संबंधित वनवृत्तापुरतेच मर्यादित आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पुणे हे कार्यालय संयुक्त महाराष्ट्र राज्य करारान्वये १९८७ला पुण्यातून नागपूर येथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनातील अन्य विभाग व वनविभागाच्या नागपूर येथील कार्यालयातून तसेच वनविभागाच्या अन्य कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांकडून या कार्यालयात येण्याबाबत इच्छापत्र घेण्यात आले. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) १९८१च्या नियम २३च्या तरतुदीनुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांचा मूळ वनवृत्तातील धारणाधिकार संपुष्टात येऊन पदोन्नती/पदावनतीबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. त्या अन्वये कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता सूची स्वतंत्र ठेवण्यात आली होती. त्यालाच अनुसरून आजतागायत कार्यवाही सुरू आहे. मात्र, आता मुख्यालयातील वर्ग तीन व चारची आस्थापना नागपूर वनवृत्तात संलग्न करण्याची कार्यवाही सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती व तणावाचे वातावरण आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition segregation nagpur forest ssh
First published on: 29-06-2021 at 00:58 IST