लोकसत्ता टीम

यवतमाळ : आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आज, रविवारी येथील आझाद मैदानातून काढण्यात आलेल्या महामोर्चात मराठ्यांना कुणबी, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात आला. ओबीसी बांधवांनी यावेळी एकजुटीचा संदेश दिला. या मोर्चात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, ओबीसींसाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृह सुरू करण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करावी, आदी मागण्यांसाठी ओबीसी महामोर्चाकडून मोर्चा काढण्यात आला. स्थानिक महात्मा फुले चौकातून निघालेला हा मोर्चा यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

आणखी वाचा-गडचिरोली : वाढदिवशी तलवारीने केक कापणे पडले महागात

थोर पुरुषांच्या वेशात सहभागी झालेली बालके, डफडी, ढोल ताशा वादक पथके, लक्षवेधी ठरले. महात्मा फुले चौकातून निघालेला हा मोर्चा यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी आणि काही प्रमुख नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले. तीव्र आंदोलनासाठी ओबीसी बांधवांनी सज्ज राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.