लोकसत्ता टीम
बुलढाणा: अंचरवाडी ते अंढेरा फाट्यादरम्यान आज, शुक्रवारी एक संत्रा मालवाहक ट्रक उलटला. रस्त्याच्या खाली हा ट्रक उलटला असून लोकांनी पोते, थैलीसह मिळेल त्या साधनाने वाहनातील संत्री भरून घरी नेण्याचा सपाटा लावला.
आणखी वाचा-विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या अपघातात एक जण जखमी झाला आहे. महाराष्ट्रातून ही संत्री केरळ मध्ये नेण्यात येत होती. अंचरवाडी ते अंढेरा दरम्यान असलेल्या वळणावर ट्रक उलटून रस्त्याच्या खाली डोंगरउतारावरून घसरत गेला. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात येताच लोकांनी मिळेल त्यात संत्री भरून नेली. सध्या संत्र्याचा ट्रक अर्धा खाली झाला असून अजूनही लोक ट्रक वर तुटून पडले आहेत.