नागपूर : अश्लील चित्रफिती बघणे, इंटरनेटवर शोधणे आणि एकमेकांना पाठवणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, हा गुन्हा वारंवार घडत असल्याने नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर गेल्या तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. परंतु, यातील केवळ दीडशेवर प्रकरणांतच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.

तक्रारी नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगाल तर महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. इंटरनेटवर काहीही शोधले तरी अनेकदा ‘साईड बार’ला काहीतरी अश्लील चित्र असलेली जाहिरात दिसत दिसते. अनेक जण उत्सुकतेपोटी त्यावर ‘क्लिक’ करतात व नंतर बराच वेळ तिथेच अडकून पडतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपवर मोठ्या प्रमाणात अश्लील चित्रफिती प्रसारित होत असतात. परंतु, हा गुन्हा असल्याने याबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर सुविधा उपलब्ध आहे. २०२० ते २०२३ या काळात या पोर्टलवर दीड लाखावर तक्रारींची नोंद झाली आहे. सर्वाधिक तक्रारी पश्चिम बंगालमधून (६७ हजार) नोंदविण्यात आल्या. त्या खालोखाल तामिळनाडू (१२.७ हजार) आणि महाराष्ट्रातून (१०.८ हजार) तक्रारी नोंदवल्या गेल्या. यातील केवळ पश्चिम बंगालमध्ये १३, तामिळनाडूत ३ आणि महाराष्ट्रात ९ गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारींच्या संख्येच्या तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

हेही वाचा…वर्धा : गांधींच्या जिल्ह्यातून गोडसे विचार हद्दपार करा, माजी पालकमंत्री सुनिल केदार म्हणतात, “महात्म्यांचा तिरस्कार…”

नाव गुप्त ठेवून तक्रारीची सुविधा

समाजमाध्यमांवर कुणी अश्लील छायाचित्र-चित्रफीत टाकल्यास त्याची तक्रार ऑनलाईन पोर्टलवर करता येते. अशा वेळी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याची सुविधा पोर्टलवर आहे. ही तक्रार संबंधित राज्य पोलिसांकडे वर्ग करण्यात येते.

हेही वाचा…बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक गुन्हे उत्तरप्रदेशात

अश्लील छायाचित्र किंवा चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी सर्वाधिक तक्रारी (४,३०९) उत्तर प्रदेशात दाखल आहेत. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (१,४११) असून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात ३९९ गुन्हे दाखल आहेत. एका संकेतस्थळाच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नागपूर शहरात सर्वाधिक ‘पॉर्न’ शोधले जाते.