बुलढाणा : मोताळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या धामणगाव बढे येथे शिवसेनेच्या शिंदे गटाला खिंडार पडले आहे. तेथील माजी सरपंचासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संजय राठोड व ॲड. गणेशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली खेडी (तालुका मोताळा) येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.

हेही वाचा >>> Video : मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण, ‘व्हायरल व्हिडीओ’ने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी धामणगाव बढे ग्रामपंचायतचे माजी सरपंच गजानन भोरे, विद्यमान सदस्य सौ. भोरे यांचे चिरंजीव तथा सदस्य दीपक भोरे, उमेश गोरे आणि धामणगाव बढे उपसरपंच भास्कर हिवाळे यांचे चिरंजीव सुनील हिवाळे, एआयएमआयएम चे शहर अध्यक्ष सद्दाम कुरेशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, धनराज महाजन काँग्रेस नेते, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जमीर कुरेशी, विठ्ठल चव्हाण, बुलढाणा विधानसभा अध्यक्ष आतिश इंगळे, तालुकाध्यक्ष श्याम कानडजे, उपाध्यक्ष इम्रान शेख, सादिक शाह, प्रकाश लवांडे, आलिम शाह उमराव अहिरे आदी उपस्थित होते.