चंद्रपूर: कोरपना तालुक्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र वाळू तस्करांनी पूर्णतः पोखरून ठेवले आहे. येथून वाळूची तस्करी खुलेआम होत असताना तलाठी, महसूल अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम पैनगंगा नदी कोरडी पडली आहे.

कोरपना तालुक्यातील वनोजा झोटिंग, अकोला, कोठोडा, परसोडा घाटावर गेल्या चार-पाच महिन्यापासून रेती तस्करांनी धुमाकुळ घालत चोरीच्या मार्गाने वाळू वाहतूक करून कोट्यावधीच्या शासनाच्या स्वामित्व धनाला चुना लावीत सन २०२५ सुगीचे उगवल्याचे नवीन तस्करांची फळी उभी झाली आहे. येथे बिनधास्त नवीन नवीन ट्रॅक्टर खरेदी करून तस्करांनी आपला व्यवसायाचा मोर्चा नदी घाटाकडे नेऊन जोमाने व्यवसाय थाटला आहे. मात्र महसूल प्रशासन कोमात आहे की तस्करांच्यापाठीशी खंबीर उभा आहे का ? असा प्रश्न पडला आहे.

गावागावात वाळू तस्करीची चर्चा रंगू लागली. एवढेच नव्हे तर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्या पोलीस विभागाकडे आहे. या भागातील राजकीय नेते, अधिकारी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन तस्करांना बळ देत असल्याने कारवाईची काय भीती यावरून कुंपणच शेत खात असल्यामुळे कारवाईचा प्रश्न कुठे येतो कारण तस्करांचे अर्धे अधिक काम लोकेशनचे यांच्याकडूनच पार पाडल्या जात असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची आणि या तोऱ्यातूनच तस्करांची लाबी तयार होऊन कोरपणा तालुक्यातील अनेक नदी घाटावर धुमाकूळ घातला आहे. रात्रंदिवस कायद्याच्या चाकोरी बाहेर जाऊन जेसीपी नदीमध्ये लावून वाळू तस्करी होत असताना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनातील सक्षम अधिकारी अनभिज्ञ कसे यांना या सर्व कारभाराची माहिती अशी कशी नाही. सर्व घाट नियमबाह्य पोखरून काढले आहे. साज्यातील मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी सुरू असलेल्या घडामोडी कशा काय माहित नाही. गेल्या चार महिन्यापासून एक तरी घाटावर जाऊन स्थळ पंचनामा पाहणी किंवा वरिष्ठाला या घटना अवगत करून देणे हे यांचे कर्तव्य नव्हते का, एकीकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर इंस्टाग्रामफेसबुक वर डॉन के इलाके मेकोई डर नही लुटो खजाना लुटे चे गाणे उत्खनन करताना शूटिंग करून वायरल केल्या जाते तर एवढ्या प्रमाणात तस्करी होत असताना पोलिसांना कळविले तर ते म्हणतात हे काम महसूल विभागाचा आहे आणि महसूल अधिकारी स्विच ऑफ क्षेत्र बाहेर नेहमी असल्याने व ही जबाबदारी तलाठीकडे दिली असल्याचे सांगून मोकळे होतात, मग कारवाई करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची, कारवाई होत नसल्याने तस्करांचे हौसले बुलंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ मार्च २०२५ पासून २० मे २०२५ म्हणजे ८० दिवसात महसूल विभागाची एवढी यंत्रणा खालच्या पातळीपासून वरपर्यंत असताना फक्त दहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. वाळू चोरी अवैध साठवणूक होत असताना व पूर्वीपेक्षा तलाठ्यांचे भौगोलिक क्षेत्र कमी होऊन नवीन भौगोलिक क्षेत्रात कमी गावात जबाबदारी मोजकी गावे समाजामध्ये असताना ग्राम महसूल अधिकाऱ्यांना माहिती नसावी यावर नागरिकांचा विश्वास बसणार नाही. तहसीलदाराने रस्त्याने वाहन फिरवल्याने वाळू तस्करावर आळा बसणार का, महसूल विभाग नदी पोखरून रेती वाहतुकीचे मौक्का पंचनामे उत्खनन क्षेत्राचे फोटो व्हिडिओ जीपीएस लोकेशन शूटिंग करून कारवाईचा बडगा उभारणार का, रेती तस्करांचे मुस्के आवळणार का की आगामी पावसाच्या येणाऱ्या सरीबरोबर हे पाप लपून पुराच्या पाण्यातून वाहून जाणार का अशी चर्चा लोकांमध्ये असून तत्परतेने पावसापूर्वी महसूल विभाग याबद्दल झालेल्या स्वामित्व धनाची नुकसानीची दखल घेऊन चौकशी करून कारवाई करणार का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे. – काही कर्मचारीसुद्धा तस्करांना मदत करत असल्याची नाव न सांगण्याच्या अटीवर एका गावच्या व्यक्तीने माहिती दिली.