नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर जोगळदरी गावाजवळ पुलाचे काम चालू असताना पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – बुलढाणा : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या युवकाचा मृत्यू

सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाचे काम सुरू आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जोगळदरी गावाजवळील पुलाचे बांधकाम कोसळले. यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पुल कोसळल्याची घटना घडली असता परिसरातील नागरिकांची गर्दी केल्यामुळे पोलीस पाठवण्यात आले होते. घडलेली घटना कुणाच्या लक्ष्यात येऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदाराने रात्रीतून सावरासावर केल्याचे समजते.

हेही वाचा – नागपूर : केवळ धक्का लागला म्हणून युवकाला धावत्या रेल्वेतून दिले फेकून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याचे काही ठिकाणचे काम बाकी असून उदघाटनावरून देखील तारखांवर तारीख सुरू आहे. रस्त्यांचे काम खरंच गुणवत्तापूर्वक सुरू आहे का, हे तपासून पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.