लोकसत्ता टीम

वाशीम: जिल्हयात एकुण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबिन पिकांची पेरणी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना अनेक ठिकाणी पिकावर पिवळा मोझ्यक व कारपा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चालू आठवडयात चांगला पाऊस झाल्याने पिक परिस्थितीत सुधारणा होत आहे. परंतू काही ठिकाणी सोयाबिनवर शेंगावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तसेच काही ठिकाणी पिवळा मोझॅक चा धोका वाढला आहे. शेंगा व खोडावरील करपा रोग हा मुख्यत: बुरशीजन्ये असून या रोगामुळे खोड व शेंगा काळया पडतात. दाणे भरण्याऐवजी ते बारीक होऊन शेंगा वाळतात त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा-सावधान! पनीर खाताय, मग ही बातमी नक्कीच वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी घ्या काळजी!

या रोगाचे नियंत्रणाकरीता टेबुकोनॅझोल १० टक्के, सल्फर १० टक्के २५ ग्रॅम, १० लिटर पाणी किंवा प्ल्युक्झापायरोझाड १.६७ आणि पायरोक्लोयस्ट्रॉबिन ३.३३ टक्के ६ मिली १० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकरी आरीफ शाह यांनी केले आहे.