वर्धा :  मध्यप्रदेश शासनाने मंजूर केलेली स्मशानभूमीची जागा ‘गायब’ झाल्याने आलोडीकर अवाक झाले आहे. वर्धेलगत असणाऱ्या आलोडी परिसरात जागेला सोन्याचे भाव आले आहे. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीची विस्तीर्ण जागा शासनाच्या लेखी बेदखल करण्याची बाब आश्चर्याची समजल्या जाते.

स्मशानभूमीसाठी ही जागा मध्यप्रदेश शासनाने १९५५ मध्ये मंजूर केली होती. त्याच जागेवर अंत्यसंस्कारसह विविध सोपस्कार पिढ्यानपिढ्यापासून चालू आहे. मात्र, वर्षभरापूर्वी या जागेचा ‘निस्तार हक्क’ शासकीय कागदपत्रातून बेदखल करण्यात आला. म्हणजेच या जागेवर स्मशानभूमी नव्हतीच, असे दाखविण्याचे प्रकार असल्याचे आलोडी समस्या निवारण समितीचे अरूण गावंडे म्हणाले.

हेही वाचा >>> नागपूर : फडणवीस यांनी स्वीकारले शंभर रुग्णांचे पालकत्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हक्काची स्मशानभूमी ‘गायब’ करण्यात आल्याचा प्रकार झाल्याचे ते सांगतात. २६ डिसेंबरला हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले. मात्र, अद्याप उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार घडण्यामागे भूखंडाचे व्यवहार असल्याचा आरोप होतो. या स्मशानभूमीलगत काहींची शेती आहे. यापैकी काही शेतीवर लेआऊट टाकण्याचा व्यवहार ठरला. मात्र, लगत स्मशानभूमी असल्याने जागेची किंमत घसरली. स्मशानभूमी न राहल्यास जागा चढ्या भावाने हमखास विकल्या जाते. म्हणून स्मशानभूमी ‘गायब’ करण्याचा प्रकार झाल्याची परिसरात चर्चा आहे.