गोंदिया : तालुक्यातील गंगाझरी येथे १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित युवकांनी ‘जूमला नही जवाब दो, युवाओं को रोजगार दो‘ च्या घोषणा देत तेथील बसस्थानक परिसरात एकत्र होत केक कापला.

गंगाझरी (टिकायतपूर) येथील बसस्थानक परिसरात परिसरातील युवकांनी सायंकाळी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने ‘केक’ कापून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला. पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी लाल किल्यावरून प्रत्येक वर्षी दोन कोटी सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळून देण्याची घोषणा केली होती, या घोषणेचे काय झाले? असा प्रश्नही यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी उपस्थित करून घोषणाबाजी केली.

हेही वाचा – “हे कसले बहुजन कल्याण मंत्री!” अतुल सावे राजीनामा द्या, ओबीसींची मागणी; कारण काय जाणून घ्या…

उपस्थित युवकांच्या मते केंद्र सरकारने जर प्रत्येक वर्षी २ कोटी युवकांना शासकीय नोकरी उपलब्ध करून दिली असती तर आज सुमारे १८ कोटी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली असती, आणि त्यांच्या मागे अंदाजे ७० कोटींच्या वर नागरिकांच्या कुटुंबाचा राहणीमान उंचावला असता. व त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास झाला असता. मात्र, मोदी सरकारचे मंत्री रविशंकर प्रसाद पत्र परिषदेत ‘हमने क्या ठेका लेकर रखा है क्या नोकरी देणे का’ तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे स्पष्टपणे ‘ये सिर्फ एक चुनावी जुमला था’ असे म्हणतात. यावरून मोदी सरकार फक्त पुंजीपती यांचे सरकार असून सर्व शासकीय यंत्रणा कंत्राटी पद्धतीवर भरून सरकारचे खाजगीकरण करण्यावर भर असल्याचे बोलण्यात आले.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही ओबीसी मोर्चावर ठाम का आहेत? शिंदे, फडणवीस यांनी काय संभ्रम निर्माण केला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी माजी पं. स. सदस्य प्रकाश पटले यांच्या हस्ते केक कापून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ साजरा करण्यात आला. प्रसंगी सरपंच सोनू घरडे, ग्रा.पं सदस्य महेंद्र धुर्वे, दिगंबर पारधी यांच्यासह गावातील सुशिक्षित बेरोजगार विशाल उके, लोकेश नागभिरे, गौरव लिल्हारे, सिद्धार्थ बोंबार्डे, महेश बबरिया, विनोद कोहपरकर, नामदेव मेश्राम, छगनलाल लिल्हारे, भुमेश्वर ठाकरे, अनमोल वरकडे, धर्मराज बोम्बार्डे, नरेश ईनवाते, रोशन कावळे, वाशिम शेख, सुधाकर वलके, अनमोलसिंग उईके, दशरथ चौधरी, श्रिकिसन मारबदे, दिनेश कुंभरे, महेन्द्र मेश्राम, मंगेश कलसे, सुशील टेकाम शेखर उईके आदी सुशिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते.