चंद्रपूर : राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अन्नत्याग आंदोलन व ओबीसी मोर्चाला पाठ दाखविली. हे कसले बहुजन कल्याण मंत्री, असे म्हणत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून १ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले

हेही वाचा – अमरावती : गावाला जाताना झाला वाद, पतीने केली पत्नीची हत्या; पसार झालेल्या पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे मराठा समाजाचे जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, नेत्यांनी तिथे हजेरी लावली. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हेदेखील उपोषण मंडपात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन आले. मात्र आता ओबीसी संघटनेचे रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्याकडे बहुजन कल्याण मंत्री सावे यांनी पाठ फिरवली. तसेच ओबीसी मोर्चाकडेदेखील ते फिरकले नाही. राज्यातील मराठ्यांना एक न्याय आणि ओबीसी समाजाला दुसरा न्याय हे खापवून घेतले जाणार नाही. आगामी निवडणुकीत आम्ही जागा दाखवू, असा इशारा देत सावे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.