बुलढाणा: जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होतो. मात्र मेहकरात ट्रॅक्टर पोळ्याची संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. यंदाच्या पोळ्यातही ही अभिनव परंपरा कायम राहिली.बैलांचे घटते प्रमाण, त्यामुळे शेतीचे झालेले यांत्रिकीकरण, बैला ऐवजी ट्रॅक्टरने होणारी कामे यामुळे मेहकर मध्ये आता आधुनिक पद्धतीने पोळा भरतो. शिवसेना(उबाठा)चे शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या संकल्पनेतून हा पोळा भरला.

जानेफळ मार्गवरील संपर्क कार्यालयापासून या पोळ्याची सुरुवात झाली. शहर व ग्रामीण भागातील शेतकरी सुशोभित ट्रॅक्टरसह जमले. उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे पूजन करून या पोळ्याला सुरुवात करण्यात आली. ट्रॅक्टरची मेहकर शहरातून ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा >>>पोळ्याच्या दिवशी प्रगतशील शेतकऱ्याच्या अवयव दानातून सहा कुटुंबात प्रकाशाची पेरणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिजाऊ चौक,जुने बस स्टॅन्ड, बाबासाहेब आंबेडकर वाटिका चौक, स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक या मार्गाने ग्रामदेवता शितलामाता मंदिर येथे मिरवणूक दाखल झाली.