वाशिम: अमरावती परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरिक्षकांनी (आयजी) २१ जून रोजी नि:शस्त्र पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी करून तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश विभागातील सर्व पोलिस अधीक्षकांना (एसपी) दिले. मात्र, याला वाशीम येथील स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक (पीआय) सोमनाथ जाधव अपवाद ठरले असून, बदलीच्या २८ दिवसातही त्यांना कार्यमुक्त केले नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती कार्यालयाने २१ जून २०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१) व (२) नुसार अमरावती विभागातील विहित कालावधी पूर्ण केलेल्या निःशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदलाचे आदेश काढले होते. यामधे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस एम जाधव व आधार सिंग सोनोने यांची बदली यवतमाळ येथे बदलीचे नमूद होते. सोनोने यांना कार्यमुक्त करण्यात आले असून ते यवतमाळ येथे रुजू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा… ओबीसी कोट्यातून आरक्षण, मराठा महासंघ दिल्लीत धडकणार

यवतमाळ जिल्ह्यातून चार अधिकारी वाशिम जिल्ह्यात बदलून येण्याचे आदेशात आहे. आयजी कार्यालयाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एम जाधव यांच्या बदलीचे आदेश काढून जवळपास २८ दिवस उलटले आहेत. तरी देखील घटक प्रमुखांनी त्यांना कार्यमुक्त केले नाही.

हेही वाचा… सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) कार्यालयाकडून बदली केलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश असताना देखील त्याची अमलबजाणी झालेली दिसून येत नाही. याबाबत काय अडचण आहे. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.