नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरसमारी गावाजवळील गिरनार फार्महाऊसमध्ये ‘रेव्ह पार्टी’ आयोजित करणारा युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता, अशी माहिती समोर आली. युवक काँग्रेसचे राज्य सचिव सईश वारजूरकर आणि त्याच्या सहकाऱ्याने मोठा खर्च करून  ‘रेव्ह पार्टी’चे आयोजन केले होते. सईश वारजूरकर हे काँग्रेस नेते सतीश वारजूरकर यांचे पुत्र असून सतीश वारजूरकर यांनी चिमूरमधून विधानसभा निवडणूक लढवली हाेती. याशिवाय सईश हे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर यांचे पुतणे आहेत.

या पार्टीसाठी ग्रामपंचायत, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती. आयोजकच काँग्रेसचा पदाधिकारी असल्यामुळे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी हिंगणा पोलिसांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवल्याची माहिती आहे.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

 पार्टीत शेकडो तरुण-तरुणीसह काही राजकीय नेत्यांचे पुत्र, नातेवाईक तसेच गुन्हेगारी जगतातील बरेच जण सहभागी झाले होते.  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या पार्टीच्या आयोजनाबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्रुव पांडे आणि संजय गायकवाड या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. यापूर्वी ठाणेदार बळीराम परदेशी यांचीही बदली करण्यात आली. या पार्टीत डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती, अशी माहिती आहे.

दरम्यान, युवक काँग्रेसचे सचिव सईश वारजूरकर यांनी एकट्याने या पार्टीचे आयोजन केले नसून या पार्टीसाठी रितसर परवानगी घेतली होती. सूडभावनेने ही कारवाई करण्यात आली, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिब अजित सिंह सांगितले.