गेल्या काही दिवसात देशभरात हिंदू संघटनांच्या वतीने राज्यातील अनेक शहरात मोर्चे काढले जात आहे. खरे तर धर्मांतरण आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना मोर्चे काढण्याची गरज काय, त्यापेक्षा मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री

तोगडिया नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. तोगडिया म्हणाले, सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार केला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, देशातील लोकसंख्येचे असंतुलन न रोखल्यास ५० वर्षांनंतर थेट अयोध्येतील या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा तातडीने व्हायला हवा. केंद्रातील वर्तमान सरकारचा कार्यकाळ वर्षभरात संपत आहे. त्या आधी हा कायदा होईल, असा विश्वास आहे. काशी, मथुरा मंदिर निर्माण होण्यासाठी कायदा तसेच ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदासुद्धा तयार व्हावा, लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार व्हावा तरच यश घेण्याचा अधिकार या सरकारला मिळेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम मंदिरासाठी नेतृत्व करणाऱ्यांना भारतरत्न द्या
ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नसते. राम मंदिरासाठी कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोक सिंघल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू या सर्वांना भारताने केंद्र सरकाने भारत रत्न देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी तोगडिया यांनी केली.