नागपूर : मराठा आरक्षण देण्याची भूमिका ही भाजपची भूमिका आहे. महायुती सरकार यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास व्यक्त करत मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने करू नये व अकलेचे तारे तोडू नये, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. एका घटकाचे आरक्षण दुसऱ्या घटकाला देणे योग्य नाही. ओबीसीचे आरक्षण कायम राखून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षण दिल्यावर न्यायालयात चकरा माराव्या लागणार नाही. फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी भूमिका सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी आर्थिक-सामजिक सर्वेक्षणाच्या आधारावर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलन : मोताळा येथील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, अन्नत्यागावर ठाम…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकजा मुंडे यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून कोणतेही तर्क लावून नका. त्यांनी यात्रेचा उद्देश व भूमिका आधीच जाहीर केली आहे. राज्यात तीन नेते असून तिन्ही नेत्यांत योग्य समन्वय आहे. त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम असू शकतात. त्यावरून चर्चा करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.