लोकसत्ता टीम

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यासाठी रविवारी स. ९ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले.

विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, मुख्यसचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, पद्मश्री सन्मानित डॉ अनिल महात्मे यांनी स्वागत केले

पंतप्रधान .मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान मोदी दीक्षाभूमी तसेच रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.