नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभा रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये होणार आहे. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे रामटेक मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाटय़ाला आला असून राजू पारवे हे तेथील महायुतीचे उमेदवार आहेत.

नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदिया व चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. पाचपैकी तीन ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आहेत. ‘मिशन-४५’ अभियानानुसार महायुतीने विशेषत: भाजपने या सर्व जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत.

Eknath Khadse
एकनाथ खडसे भाजपाच्या वाटेवर? राजकीय पुनर्वसनासाठी घरवापसीची शक्यता!
pawar group fixed 10 candidates for lok sabha election 2024 zws
Lok Sabha Elections 2024 : पवार गटाच्या १० उमेदवारांची नावे निश्चित
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

हेही वाचा >>>‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

शहा शनिवारी गोंदियात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ६ एप्रिल रोजी गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. शहा ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता नागपूर येथे येणार असून येथून ते हेलिकॉप्टरने गोंदियाला जातील. तेथे ४ वाजता सभा होईल.