राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या डॉ. धर्मेश धवनकर यांच्या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आहे. धवनकरांनी आपल्या सहकारी प्राध्यापकांकडून खंडणी वसूल केल्याची तक्रार झाल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली. तर दुसरीकडे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावरही आरोप झाले. त्यामुळे विद्यापीठात ३ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठ दाखवणार, अशी चर्चा रंगली आहे. पंतप्रधान या कार्यक्रमाला केवळ ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, अद्यापही पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक न आल्याने ही शक्यता बळावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘मला मित्र नाहीत, त्यामुळे जीवनाला कंटाळून….’

‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची परंपरा आहे. यंदा नागपूर विद्यापीठाकडे सायन्स काँग्रेसचे यजमानपद आहे. मात्र, सध्या विद्यापीठातील गैरप्रकाराचीच चर्चा जास्त आहे. याचा परिणाम पंतप्रधानांच्या दौऱ्यावरही होण्याची शक्यता आहे. याआधीही विद्यापीठाच्या १००व्या दीक्षांत सोहळ्याच्या तोंडावर असाच काहीसा प्रकार घडल्याने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वेळेवर आपला दौरा रद्द केला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi is likely to attend the indian science congress program online dag 87 amy
First published on: 14-12-2022 at 14:49 IST