अकोला : खावटी बंद करण्यासाठी न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी करून दस्तऐवज तयार करण्यात आले. त्याचा वापर करणाऱ्या आरोपी संतोष आत्माराम इंगळे (३८, रा. नवेगाव, ता. पातूर) यास तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी हा निकाल दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी संतोष आत्माराम इंगळे याच्या विरुद्ध तत्कालीन न्यायालय अधीक्षक कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरगुती हिंसाचार प्रकरण हे पातूर न्यायालयात ललिता विरुद्ध संतोष असे दाखल होते. या प्रकरणांमध्ये तत्कालीन पीठासीन अधिकारी आसुदानी यांची संतोष इंगळे याने खोटी स्वाक्षरी करून बनावट दस्ताऐवज तयार केले.

हेही वाचा – अमरावती : सुरक्षेसाठी पासवर्ड बदलण्‍याचा प्रयत्‍न केला; तरीही सायबर लुटारूंनी ३ लाख केले लंपास

खावटी कपात थांबवण्याचे बनावट आदेश तयार केले. तो कार्यरत असलेल्या शाळेला पाठवून अर्जदार ललिता हिची खावटी बंद केली. न्यायालयाची फसवणूक केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, त्यामध्ये सरकारी पक्षाने बारा साक्षीदार तपासले. या प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

हेही वाचा – वर्धा : रोजचेच मरण, तरी १४ वर्षांपासून डॉक्टर नाही

तपास अधिकारी पीएसआय हर्षू रत्नपारखी यांनी तपास केला, सरकारी वकील सुनीता शर्मा यांनी बाजू मांडली व पैरवी अधिकारी म्हणून मो. नियाज मो. अयाज यांनी काम पाहिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punishment for accused who forged document with signature of judge ppd 88 ssb
First published on: 10-08-2023 at 10:43 IST