नागपूर : मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनाही बसला आहे. नागपूरला येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेने नागपूरसह विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तर रेल्वेगाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२० ऑगस्टला १२१४० नागपूर ते सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस आणि २१ ऑगस्टला ११००२ बल्लारशाह ते सीएसएमटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर काही रेल्वेगाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. १२१०५ सीएसएमटी ते गोंदिया एक्सप्रेस रात्री १०.४५ वाजता, १२२८९ सीएसएमटी ते नागपूर एक्सप्रेस रात्री ११.३० वाजता आणि १२१११ सीएसएमटी ते अमरावती एक्सप्रेस रात्री ११.४५ वाजता निघेल. २२१०९ एलटीटी-बल्लारशाह एक्स्प्रेस आता २० आणि २१ ऑगस्टला सकाळी ७ वाजता निघेल. १२८५९ गीतांजली एक्स्प्रेस, १२२६१ हावडा एसी दुरांतो, १२१०५ विदर्भ एक्स्प्रेस, १२२८९ नागपूर दुरांतो एक्स्प्रेस विलंबाने धावत आहेत.