नागपूर : इतवारी (नागपूर) ते नागभीड ब्रॉडगेज मार्गाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात इतवारी ते उमरेड मार्गावर डिसेंबरपर्यंत रेल्वेगाडी धावू शकेल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’ संकट गडद, हल्ल्यात शेती व घरांचे नुकसान; नागरिक दहशतीत

हेही वाचा – नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात! माजी आमदाराचे भाकीत; म्हणाले, “आता काँग्रेसमधील…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृत भारत योजनेअंतर्गंत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या गोंदिया, वडसा रेल्वे स्थानकाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ६ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी उमरेडपर्यंत रेल्वेगाडी डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार असल्याचे सांगितले. तसेच गोंदिया ते जबलपूर दुहेरी मार्गाचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाला सादर करण्यात आल्याची माहिती दिली. मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला दुर्ग ते नागपूर तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले असून मार्च २०२४ पर्यंत हे पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या.