वर्धा : जिल्ह्यात सर्वत्र संततधार पडली. त्यामुळे ग्रामीण वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. काही गावांना पाण्याचा विळखा पडला. तर अनेक गावांतील लहान घरात पुराने नासधूस झाली. या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे. वृद्ध,रुग्ण, गर्भवती माता यांच्यावर लक्ष केंद्रित करीत दक्षता घेण्याचे उपाय होत आहे. पुराची पातळी वाढल्यास यांना अन्यत्र हलविण्याबाबत काय केल्या जावू शकते, या बाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी प्रत्यक्ष भेटी देत गावकऱ्यांशी चर्चा केली.

गावकऱ्यांच्या संपर्कात राहून तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लाल नाला प्रकल्प व वर्धा नदीचे पाणी समुद्रपुर तालुक्यातील डोंगरगाव व हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावात शिरले आहे. भेटीत या गावांचा सुरक्षा विषयक आढावा घेण्यात आला. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. काही गावकऱ्यांना अन्यत्र स्थलांतरित करीत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा – Video : महिला नालीत पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, नगर परिषदेविरोधात यवतमाळ शहरात प्रचंड रोष

हेही वाचा – “हिंदू समाज स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा…”, शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, वीरेंद्र जाधव, तहसीलदार सतीश मासाळ, कपिल हटकर तसेच ठाणेदार, सरपंच, कोतवाल, पोलीस पाटील हे चर्चेत सहभागी होते.