वर्धा : देश-विदेशात स्वदेशी चळवळ रुजवणारे दिवंगत राजीव दीक्षित यांचे बंधू प्रदीप दीक्षित यांना राजस्थान पोलिसांनी आज बुधवारी वर्धेतून ताब्यात घेतले. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिवं. राजीव यांच्या पश्चात प्रदीप हेच स्वदेशीचा सेवाग्राम येथील कारभार सांभाळत होते. तसेच गोशाळा व अन्य देशी उत्पादनवाढीसाठी ते आपल्या बंधूंचा वारसा पुढे नेत होते.

हेही वाचा >>> मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर यांच्या पुतण्याची आत्महत्या की हत्या? जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना स्थानिक पोलिसांनी सूचना न देता ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र सेवाग्रामचे  ठाणेदार नीलेश ब्राम्हणे म्हणाले, राजस्थान पोलिसांची चमू मी हजर नसताना ठाण्यात येऊन गेल्याची माहिती आहे. राजस्थान न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई झाल्याचे समजते. एका गांधीवादी व्हॉट्सॲप समूहावर आलेली माहिती त्यातील एका सदस्याने लोकसत्तास पाठवल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. याबाबत पोलीस अधीक्षक नुरूल हसन म्हणाले, राजस्थान येथे फसवणुकीचा मोठा प्रकार झाला. त्यातून ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांना न सांगता देखील आरोपीस अटक होऊ शकते, असे अन्य एका वरिष्ठाने नमूद केले.