अकोला : वसंत ॠतूत आकाशात नवी नवलाई अनुभवता येणार आहे. अवकाशात आकर्षक घडामोडींची पर्वणी उपलब्ध होणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच ग्रह दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. पृथ्वीवरून मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसणार आहेत. यामध्ये बुध व गुरु ग्रह संध्याकाळी पश्चिम आकाशात, तर मंगळ, शुक्र व शनी ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर बघता येतील. ग्रहताऱ्यांसोबतच धूमकेतूचे दर्शन होत आहे. सद्यस्थितीत पश्चिम आकाशात देवयानी तारका समूहाजवळ मीन राशीत असेल. १८१२ या वर्षी पोन्स व ब्रुक्स यांनी शोधलेला हा आकाश पाहूणा सुमारे ७१ वर्षांनी सूर्य व पृथ्वी जवळ येत असल्याने त्याचे लांब शेपटीचे दर्शन रात्रीचे प्रारंभी पश्चिमेस घेता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.

हेही वाचा…अकोला : वेगवेगळ्या यंत्रावर मतदारांना द्यावे लागणार दोन मते; वाचा नेमके कारण काय?

२० मार्च रोजी महाविषुवदिन असून पृथ्वीचे दोन्ही गोलार्धात दिवस रात्र समान असतात. विषुववृत्तावर प्रत्येकी १२ तासांचा दिवस व रात्र असते. २२ ला सर्वात तेजस्वी शुक्र व वलयांकित शनी ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व आकाशात कुंभ राशीत आहे. पहाटे ३.३६ वाजता यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल. दि.२३ रोजी पृथ्वी व चंद्र यांच्या मधील अंतर अधिक असल्याने चंद्र आकाराने जरा लहान दिसेल. २४ ला होळी पौर्णिमा असून निसर्गातील सुरू होणाऱ्या विविधरंगी उत्सवात निसर्ग संवर्धनार्थ सहभागी होता येईल.

हेही वाचा…रिपाइंला शिर्डी, सोलापूरची जागा हवी, आठवले म्हणाले, “नाही दिली तर…”

२५ रोजी मांद्य चंद्रग्रहण असून चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत येईल. आपल्या भागात हे ग्रहण पाहता येणार नाही. २७ मार्च रोजी चंद्र व कन्या राशीतील चित्रा यांची युती घडून येत असल्याचे प्रभाकर दोड म्हणाले. विविध घटनांचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare celestial event five planets visible to naked eyes says vishwabharati center head prabhakar daud ppd 88 psg
First published on: 17-03-2024 at 18:46 IST