नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, समितीच्या या निर्णयाविरोधात बर्वे यांनी न्यायायात धाव घेतली. मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.  

बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनीही अर्ज दाखल केला असून त्यांना आता काँग्रेस अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. रश्मी बर्वे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतले होते. जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. सुनील साळवे यांनी याबाबतची तक्रार शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने बर्वे यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. 

PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
rashmi barve
रश्मी बर्वे निवडणुकीपासून दूरच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…
Big problem for Congress in Ramtek candidates caste certificate invalid
रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

हेही वाचा >>>एएनआयच्या पत्रकाराची पीटीआयच्या महिला पत्रकाराला मारहाण; Video शेअर करत वृत्तसंस्थेनं केली कारवाईची मागणी!

बर्वे यांनी या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु सुनावणीपूर्वीच गुरुवारी सकाळी  समितीने बर्वे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला. दरम्यान, बर्वे यांनी समितीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती   केली. पण, न्यायालयाने ती नाकारली. यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

काँग्रेसचा ‘प्लॅन बी’

काँग्रेसला याबाबतची कुणकुण लागली होती. त्यामुळे रश्मी यांच्यासोबत त्यांचे पती  श्यामकुमार बर्वे यांनीही अर्ज सादर केला.  रश्मी बर्वे यांच्या अर्जासोबत जोडलेल्या काँग्रेसच्या ‘बी फॉर्म’मध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्यामकुमार बर्वे यांचे नाव आहे.  रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यास त्यांचे पती काँग्रेसचे उमेदवार होऊ शकतात.