नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रयोगशाळेतच शिंपल्याप्रमाणे दिसणाऱ्या ‘आयस्टर’ मशरूमची लागवड केली आहे. आण्विक जीवशास्त्र आणि अनुवांशिक अभियांत्रिकी विभागातील शिक्षकांनी हा प्रयोग साकारला आहे.

या प्रयोगाच्या माध्यमातून पांढऱ्या तसेच गुलाबी मशरूमची लागवड करण्यात आली आहे. विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले, डॉ. माधुरी ठाकरे, रुची वासनिक व डॉ. मोहम्मद रिजवान यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉ. स्वाती गोडघाटे, डॉ. शीतल चौधरी, नेहा कोपरे यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. साधारणतः बाजारामध्ये बटन प्रकारातील मशरूम उपलब्ध आहेत.

पौष्टिक अन्नप्रकार असताना मशरूम बाबत जागृती नाही. मशरूम दैनंदिन खाद्यपदार्थ  म्हणून समोर यावा, या उद्देशाने विभागातील संशोधकांनी समुद्रातील शिंपल्यांप्रमाणे दिसणाऱ्या ‘आयस्टर’ प्रकारातील मशरूम उत्पादनातील नवीन पद्धत शोधून काढली आहे.   पांढऱ्या तसेच गुलाबी रंगाचे मशरूम उत्पादन सोप्या पद्धतीने घेण्याची पद्धत विकसित केली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी समाजोपयोगी संशोधन व्हावे म्हणून संशोधकांना प्रेरित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आजारांसाठी उपायकारक ठरणार मशरूममध्ये उच्च प्रतीचे प्रथीने, जीवनसत्वे आहेत. आहार नियोजित करणाऱ्या व्यक्ती मशरूमचा वापर करू शकतात. सांधेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींना उच्च प्रतीची जीवनसत्वे देणारा स्त्रोत म्हणून मशरूमचा वापर करता येईल. उच्च रक्तदाब देखील नियंत्रित ठेवण्यास मशरूम मदत करतो. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी करीत कॅन्सरला देखील प्रतिबंध करण्यास मदत करतो. हाडांना मजबूत करण्याचे काम करीत असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करीत असल्याने मशरूम एक उत्तम अन्नाचा स्त्रोत असल्याने संशोधनातून पुढे आले आहे. समाजामध्ये मशरूमबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्य विभागाकडून होत आहे.