बुलढाणा : संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले. या हल्ल्याचा जिल्ह्यात निषेध करण्यात आला. मेहकर येथे आज (१४ जुलै) सायंकाळी संयुक्त रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या संभाजी ब्रिगेडसह विविध पक्षीय आणि सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत हल्ल्याचा निषेध केला.
मेहकर येथील जिजाऊ चौक येथे संभाजी ब्रिगेड (सामाजिक) प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरील अक्कलकोट येथे झालेल्या जिवघेण्या हल्ल्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मेहकर येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, भारत मुक्ति मोर्चा, बामसेफ,जमिअतए-उलेमा-हींद,जमात ए इस्लाम हींद, भिमशक्ती संघटना, बी एस फोर, गरीब ग्रेड संघटना, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार), आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नाभीक महामंडळ,छात्रभारती विद्यार्थी संघटना तसेच अनेक शिवप्रेमी बांधवांच्या उपस्थितीत रस्त्यावर उतरत निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व संघटना व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसील कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेकडे निवेदन पाठविण्यात आले.
सदर घटनेतील दोषीवर दोषींवर त्वरित कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास अन्यथा संबंध महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा इशाराही उपस्थित पक्ष, सघंटनांच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात परमानंद गारोळे, विश्वनाथ बाहेकर, विलास तेजनकर, पांडुरंग पाटील, दत्ता घनवट, एड. विष्णु सरदार, अशोक तुपकर, भागवत जाधव, माधव ससाने, योगेश निकस, म.जावेद, सत्तार शाह अफसर शाह, कैलास सुखदाने, भानुदास पवार, शंकर चांगाडे, विजय चव्हाण, गजानन मेटांगळे, मुरलीधर निकाळजे, गजानन चेके, नितीन पिसे, गजानन पवार, रज्जीक शहा कादर शहा, युकुस पटेल, विलास ठोकरे, संतोष आखाडे, भास्कर कंकाळ, जगदीश एखंडे, विनोद दांदडे, अनिल म्हस्के, संतोष निकस,आकाश निकम, राजु गंवई, गोपाल देशमुख, विकास तेजनकर, माधव निकम, गणेश धांडे, वसुदेव पोधाडे, नारायण सदार आंदींसहीत शेकडो शिवप्रेमी व समविचारी बांधव सहभागी झाले.
अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणाची संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज वाघ यांनी तीव्र शब्दात निंदा केली असून, हाच तुमचा जनसुरक्षा कायदा आहे का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे. भाजपचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर सोलापूरकर कोरटकर प्रमाणेच सरकारने कारवाई केली नाही हे उघड आहे. ही घटना शासन, प्रशासन आणि पोलीस खात्याचे धिंडवडे काढणारी आहे. ही विकृती ठेचावीच लागणार आहे आणि आम्ही ती ठेचणार आणि हाच संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे. आता आम्ही घरात घुसून मारु, असा इशारा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.