नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील तब्बल ८२३ पदांसाठी मुख्य परीक्षा २०२२ करीता पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. सदर पदांकरीता पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्य उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत.

पात्रता : वरील पदांकरीता मुख्य परीक्षेसाठी पात्र पदवीधर उमेदवार आवेदन सादर करू शकतील, तसेच पोलीस उपनिरीक्षक या पदाकरीता उमेदवाराची उंची १६५ से.मी तर छाती ७९ सेमी व ५ सेमी फुगवता आली पाहीजे, तर महिला उमेदवारांकरीता उंची १५७ सेमी असणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा – राखी निर्मितीतून अपंगांसाठी रोजगार निर्मिती

हेही वाचा – तलाठी भरती : पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याने खळबळ, नाशिकमधून गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयोमर्यादा : दिनांक ०१.१०.३०२२ रोजी – दुय्यम निबंधक या पदाकरीता १८ ते ३८ वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक आहे, राज्य कर निरीक्षक या पदाकरीता १९ ते ३८ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे, तर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांकरीता उमेदवाराचे वय १९ ते ३१ वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे व पोलीस उपनिरीक्षक या पदाकरीता १९ ते ३८ वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक असणार आहे .