‘बीएसएनएल’कडून देशभरात ‘४-जी’चा विस्तार सुरू असून त्यानंतर ‘५-जी’ सेवेचेही नियोजन आहे. त्यानंतरही ‘बीएसएनएल’मध्ये पुढील दोन वर्षे नवीन पद भरती होणार नाही. त्यातच या कंपनीत चार वर्षात निम्म्याहून जास्त कर्मचारी स्वेच्छानिवृत्त झाले, हे विशेष.

हेही वाचा- जादूटोणा?, अंगावर शाल ओढलेला एक व्यक्ती रात्री येतो, मंत्र पुटपुटतो आणि…

केंद्राच्या अखत्यारित असलेल्या ‘बीएसएनएल’ कंपनीत सुरुवातीला दीड लाखांच्या जवळपास सगळ्याच संवर्गातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची पदे मंजूर होती. २०१८ दरम्यान कंपनी तोट्यात जाऊ लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जुळवाजुळव करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे केंद्र सरकारने २०१९ मध्ये ‘बीएसएनएल’च्या खर्चात कपात करण्यासाठी एका आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहिर केली. या योजनेचा आजपर्यंत पन्नासाहून अधिक वयाच्या ७८ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

हेही वाचा- गुड न्यूज! नागपूर-गोवा रेल्वेगाडी जुलैपर्यंत धावणार

दरम्यान, आणखी काही हजार कर्मचारी येत्या एक ते दोन वर्षांत निवृत्त होणार आहे. त्यानंतर कंपनीत सुमारे ६१ हजार कर्मचारी शिल्लक राहणार आहे. कंपनीत सध्या ‘४-जी’ सेवेचा विस्तार सुरू असून ते येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. तर त्यानंतर पुढच्या सुमारे दोन वर्षांमध्ये ‘बीएसएनएल’कडून ‘५-जी’ सेवाही सुरू करण्याचे नियोजन आहे. ही विस्तारीकरणाची योजना बघता येथे आणखी पदांची गरज भासणार आहे. परंतु, कंपनीकडून पुढील दोन वर्ष पदे भरण्याचे नियोजनच नसल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा- धक्कादायक…नागपुरात कर्करोग, नवजात मृत्यूंमध्ये वाढ; काय आहेत कारणे….?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राच्या स्वेच्छेनिवृत्ती योजनेचा सुमारे ७८ हजार ५०० जणांनी लाभ घेतला. तर लवकरच आणखी काही हजार कर्मचारी स्वेच्छानिवृत्त होणार आहे. त्यानंतरही ६१ हजार कर्मचारी कंपनीकडे शिल्लक राहणार आहे. ही संख्या पर्याप्त असल्याने यापुढे किमान दोन वर्षे ‘बीएसएनएल’मध्ये पदे भरली जाणार नाही, अशी माहिती दिल्ली बीएसएनएलचे मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडणेरकर यांनी दिली