चंद्रपूर: दहशतवादी हल्ला झाल्यास ओलीस ठेवलेल्या नागरीकांची सुटका कशी करावी याबाबत चंद्रपूर येथील महाकाली मंदीर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम व प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी दहशतवादी व पोलिस यांच्यातील चकमक, हल्ला, आणि नागरिकांची सुटका अशी प्रत्यक्ष तालीम बघताना नागरिक अचंबित झाले.

 माता महाकाली मंदीर परीसरात चार दहशतवादी अचानकपणे प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भावीकांना शस्त्राचा धाक दाखवुन ओलीस ठेवले आहे” अशी माहिती मंदीर परिसरातुन पोलीस कंट्रोलरूम येथे मिळाल्यावर पोलिस निरीक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह योगेश्वर पारधी यांनी कंट्रोलरूम येथून वरिष्ठांशी योग्य समन्वय साधुन सर्व पथके  ज्या मध्ये दहशतवाद विरोधी शाखा , जलद प्रतिसाद कमांडो पथक , दंगा नियंत्रण पथक , बॉम्ब शोधक व नाशक पथक  श्वान पथक , नक्षल सेल तथा नक्षल विरोधी अभियान पथक, सुरक्षा शाखा, पो.स्टे, चंद्रपुर शहर व रामनगर, स्थानिक गुन्हे शाखा येथील विविध पोलीस पथक,  वाहतूक नियंत्रण पोलीस पथक, राज्य गुप्तवार्ता विभाग चे अधिकारी, अंमलदार, पोलीस रुग्णालय वैद्यकीय चमू वाहनासह घटनास्थळी हजर झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक  रिना जनबंधू यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव हे तात्काळ घटनास्थळी हजर होऊन अपर पोलीस अधीक्षक  रिना जनबंधु यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्व पोलीस पथकांनी योग्य खबरदारी बाळगून कोणत्याही प्रकारची जीवहानी होऊ न देता मंदीर परिसरात शिरलेल्या दहशतवाद्यांचा यशस्वी रित्या खात्मा करून त्यांच्या ताब्यातील ओलीस असलेल्या नागरीकांची सुखरूप सुटका करण्याची कारवाईचे प्रात्यक्षिक पूर्ण केले. या प्रात्यक्षिक वेळी मंदीर परिसरात व  शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेवून पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.