नागपुरातील संविधान चौकात आंदोलन

नागपूर: वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधसह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांतील अधिकारी- कर्मचारी ३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर आहेत. बुधवारी नागपुरातील संविधान चौकात या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सकाळी मोठ्या संख्येने एकत्र येत अदानी व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: भंडारा शहरावरही ‘ब्लॅक आऊट’चे संकट!; जिल्ह्यातील ७७५ वीज कर्मचारी संपावर

आंदोलनात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या तब्बल ३१ विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांनी यावेळी अदानी गो बॅक, अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका, वीज उद्योगाचे खासगीकरण करू नका, अदानी हटाओ देश बचाओ असे नारे दिले.

हेही वाचा >>> ‘अदानी गो बॅक’च्या घोषणा अन् अनेक गावांची ‘बत्ती गुल’; वाशीम जिल्ह्यातील वीज कर्मचारी आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगीकरणामुळे वीज यंत्रणेचा बट्याबोळ होऊन त्याची झ‌ळ सर्वसामान्य ग्राहकांनाही बसणार असल्याचा दावा यावेळी आंदोलकांकडून केला गेला. शासनाने तातडीने मागणी मान्य न केल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचाही इशारा यावेळी संपकर्त्यांकडून देण्यात आला. आंदोलनात महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या बॅनरखाली करण्यात आले.