भंडारा : वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने पुकारलेल्या संपात भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास शहरावर ‘ब्लॅक आऊट’चे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालवली आहे.

हेही वाचा >>> MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प

सरकार वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी आज, बुधवारपासून संपावर गेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे ७७५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. संपामळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुढील तीन दिवस अंधारात तर काढावे लागणार नाही ना, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित

वीज अधिकारी-कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी मेणबत्ती, कंदील जवळ ठेवावे, मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. संपामुळे शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. संपकाळात वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी खासगी संस्थेला सतर्क केले आहे. अडचण आल्यास आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन  वीज वितरण कंपनीचे अभियंता अधीक्षक राजेश नाईक यांनी केले आहे.